विदर्भ

अमरावती : पिंपळखुटा येथे विद्यार्थीनीची गळफास लावून आत्महत्या

backup backup

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : पिंपळखुटा येथे एका महाविद्यालयीन विद्यार्थीनीने गळफास लावून आत्महत्या केली. नेहा सुखदेव मनोहरे (वय २०, रा. पिंपळखुटा) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थीनीचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (दि.२) १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. नेहाच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, त्या अनुषंगाने मोर्शी पोलीस तपास करीत आहेत.

ही माहिती मोर्शीचे पोलीस पाटील संजय निकम यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. नेहाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर तिच्या पार्थिवावर पिंपळखुटा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणात मोर्शी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT