विदर्भ

अमरावती : आरोपी घेऊन जाणाऱ्या पोलिस कारचा अपघात; १ ठार, ४ जखमी

backup backup

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : नागपूर येथून आरोपीला घेऊन येताना उभ्या असलेल्या पोलीस कारला डंपरने धडक दिल्याने एक पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मुळशी तालुक्यातील दापोरी ते मायवाडी दरम्यान हा अपघात झाला. या अपघातात अमोल वासुदेव इंगळे यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.१८) रात्री दोन वाजताच्या दरम्यान घडली.

ब्राह्मणवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या एका घटनेतील आरोपीला अटक करण्यासाठी ब्राह्मणवाडा थडी येथून पोलीस कारमधून पोलीस नागपूर येथे गेले होते. नागपूरहून आरोपीला अटक करून ब्राह्मणवाडा थडी येथे जात होते. मोर्शी ते वरुड रोडवर असलेल्या दापोरी ते मायवाडीच्या मध्यभागी सिमेंट रस्त्याचे काम चालू असल्याने कार चालकाने आपले वाहन बाजूला उभे केले. त्यावेळी वरुड वरून भरधाव वेगाने रेती वाहतूक करणाऱ्या डंपरने या उभ्या असलेल्या कारला जोरदार धडक दिल्याने कारमधील पोलीस कर्मचारी अनुप मानकर व मंगेश पेठे तसेच त्यांचे सहकारी अमोल वासुदेव इंगळे आणि आरोपी दीपक वानखडे गंभीररित्या जखमी झाले. हा अपघात एवढा भीषण होता की कारचा पूर्णपणे चंदामेंदा झाला.

याबाबतची माहिती मोर्शी पोलिसांना प्राप्त होताच मोर्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीराम लांबाडे व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या मदतीने कारच्या वरचा टॉप काढून गंभीर जखमींना मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गंभीर जखमींवर मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे पाठविले. तर उपचार सुरु असताना अमोल वासुदेव इंगळे मृत्यू झाला. उपजिल्हा रुग्णालयात  इंगळे यांच्या पार्थिवावर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT