file photo  
विदर्भ

अमरावती : तलवारीने फोडल्या हॉटेलच्या काचा, पंचवटी चौकातील बारमध्ये टोळक्यांचा हैदोस

backup backup

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : शहरातील पंचवटी चौक स्थित हॉटेल नाईस डे बारमध्ये चार ते पाच जणांच्या टोळक्याने उभा धिंगाणा घातला. टोळक्यातील एकाने तलवारीने हॉटेलची तोडफोड केली, तर इतरांनी देखील चांगलाच राडा घातला. सोमवारी (दि.२०) सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त पूनम पाटील व गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. प्रथमदर्शनी तो वाद दारूच्या बिलावरून झाल्याचे समोर आले आहे. चार ते पाचजण सोमवारी (दि.२१) सायंकाळी हाती तलवार घेऊन हॉटेल नाईस डे मध्ये शिरले.

तेथील व्यवस्थापक व अन्य काहींना दरडावत तेरा मालक कोण? अशी विचारणा करीत त्यांनी हॉटलेच्या काचा फोडल्या. त्यापूर्वी दगडफेक देखील केली. पोलिसांची चाहूल लागताच ते चार ते पाचही जण फरार झाले. सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता या टोळक्यतील चार ते पाच जणांचे चेहरे बंदिस्त झाले असून, पोलिसांचे एक पथक त्यांच्या मागावर आहे.

हेही वाचंलत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT