विदर्भ

अमरावती : कृषीमंत्री मेळघाट दौऱ्यावर असताना शेतकरी पुत्राची आत्महत्या

मोहन कारंडे

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : राज्याचे कृषीमंत्री अब्दूल सत्तार हे 'एक दिवस बळीराजासोबत' या उपक्रमाअंतर्गत मेळघाट दौऱ्यावर असतानाच धारणी तालुक्यातील लाकटू गावातील एका शेतकरी पुत्राने आत्महत्या केल्याची घटना घडली. अनिल सुरजलाल ठाकरे (वय २६, रा. लाकटू) असे त्याचे नाव आहे. अतिवृष्टीमुळे संकटात सापडल्याने विषारी द्रव्य प्राशन करून त्याने आत्महत्या केली.

'माझा एक दिवस बळीराजासाठी' या कृषी विभागाच्या उपक्रमाला मेळघाटमधून सुरुवात झाली. कृषीमंत्री अब्दूल सत्तार सध्या मेळघाट दौऱ्यावर आहेत. धारणी तालुक्यातील साद्राबाडी येथे ते बुधवारी रात्री दाखल झाले. तेथून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या लाकटू गावात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम अद्याप सुरूच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही.

अतिवृष्टीमुळे पीक नष्ट झाल्याने येथील ठाकरे कुंटुबीय चिंतेत होते. यातूनच अनिलने विषारी द्रव्य प्राशन करून जीवनयात्रा संपवली. याबाबत माहिती मिळताच कृषीमंत्री सत्तार यांनी ठाकरे कुटुंबाच्या घरी भेट देऊन सांत्वन केले. तसेच या प्रकर‍णाची चौकशी करून अहवाल शासनाकडे पाठविण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT