जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी 'वॉक फॉर डेमोक्रेसी' च्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला.  Pudhari Photo
अकोला

अकोल्यात वॉक फॉर डेमोक्रेसी: जिल्हाधिकाऱ्यांचा नागरिकांशी संवाद

Walk for Democracy | Akola News | नागरिकांचा उस्फूर्तपणे सहभाग

पुढारी वृत्तसेवा

अकोला: पुढारी वृत्तसेवा: विविध देशभक्तीपर गीतांचे आसमंतात निनादणारे सूर, मतदार जागृतीचा संदेश देणारे आकर्षक फलक, पहाटेची प्रसन्न वेळ अशा उत्साहवर्धक वातावरणात 'वॉक फॉर डेमोक्रसी' उपक्रमात शहरातील विविध ठिकाणाहून वॉकसाठी आलेल्या नागरिकांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला.

स्वीप'अंतर्गत शहरातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान येथे, तसेच इतर उद्यानांत 'मॉर्निंग वॉक'साठी आलेल्या नागरिकांशी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी 'वॉक फॉर डेमोक्रेसी' च्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी दि.२० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रत्येकाने आपल्या मतदानाचा हक्क बजवावा, असा संदेश दिला.

नोडल अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी., मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने, उपवनसंरक्षक डॉ.कुमारस्वामी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परांडेकर, मनपा उपायुक्त गीता ठाकरे, शिक्षणाधिकारी प्राथमिक रतनसिंग पवार आदी उपस्थित होते.

वसंत देसाई क्रीडांगण येथे वॉक फॉर डेमोक्रेसीअंतर्गत जिल्हाधिकारी अजित कुंभार,. जि . प.मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी, मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने, उपवनसंरक्षक डॉ.कुमारस्वामी सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी उपस्थित क्रीडापटूंना मतदानाचे महत्त्व विशद केले. मागील विधानसभा निवडणुकीत अकोला जिल्ह्याची मतदान टक्केवारी लक्षात घेता प्रत्येकाने पुढे येत १०० टक्के मतदानाचा हक्क बजावत जिल्ह्याचा एक आदर्श निर्माण करावा, असे आवाहन केले.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट, स्वीप ब्रँड ॲम्बेसेडर पलक झामरे, स्विप अभियायानातील सदस्य आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक पल्लवी डोंगरे व आरजे दिव्या यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT