Popatkhed Dam Water Discharge Pudhari
अकोला

Popatkhed Dam | पोपटखेड धरणाचे दोन दरवाजे उघडले; पठार नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पाणलोट क्षेत्रातील दमदार पावसामुळे धरणाची पातळी वाढली;

पुढारी वृत्तसेवा

Popatkhed Dam Water Discharge

अकोला : अकोट तालुक्यातील पोपटखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी शुक्रवार, दि. ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता धरणाचे दोन वक्र दरवाजे अर्धा इंच म्हणजेच १.२५ सेंटीमीटरने उघडण्यात आले. या माध्यमातून पठार नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्यास तसेच धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकेनुसार विसर्गाचे प्रमाण वाढविण्यात येऊ शकते, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने पठार नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमधील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात जाऊ नये तसेच जनावरे नदीकाठावर सोडू नयेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, पावसाचे प्रमाण आणि धरणात होणारी पाण्याची आवक यावर प्रशासनाचे लक्ष असून, परिस्थितीनुसार पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT