अकोला : जिल्ह्यात शनिवारी सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. अशातच अनेक गावांना ढगफुटी सदृश पावसाचा फटका बसला. वृक्ष उन्मळून पडले, अनेकांच्या घरावरील छप्पर उडाले तर पिकांमध्ये पाणीच पाणी साचलेले आहे. या नुकसानीचे सर्वेक्षणानंतर चित्र दिसून येईल .मात्र या जोरदार पावसामुळे अनेक गावातील नागरिकांचे जनजीवन प्रभावित झाल्याचे दिसून आले.
जिल्ह्यातील तेल्हारा, मूर्तिजापूर, अकोला तालुक्यातील अनेक गावामध्ये ढगफुटी सदुष्य पाऊस झाल्याने नदी नाल्याना पुर आला आहे. काही गावातील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडली. तसेच नदी नाल्यांना पूर आल्यामुळे काही ठिकाणी ईतर गावांना जोडणारे रस्ते शनिवारी बंद होते.
या ढगफुटी सदृश पावसाने बाधीत गावातील पिकाचे मोठे नुकसान झाले तर नदी नाल्याकाठी असलेल्या जमीनीतील पिके खरडून गेली आहेत. नागरिकांच्या घरावरील टिनपत्रे उडुन गेली गुराचा चारा ओला झाला. अनेक गावातील वीजपुरवठा शनिवारी रात्री खंडित झाला होता रात्री उशिरा पर्यंत विज पुरवठा सुरळीत झाला नाही.प्रशासनाने या पावसाच्या नुकसानीचे सर्वेक्षण केल्यावरच नुकसानीचे चित्र समोर येईल.