अकोला : भरधाव वेगाने जाणाऱ्या कारला थांबविण्याचा ईशारा दिल्यावरही कार सुसाट वेगाने गेली. त्यामुळे संशय आल्याने गाडीचा पाठलाग करीत मुर्तिजापूर पोलिसांनी बडनेरा येथे ही कार पकडली. या वेळी चक्क कारच्या डिक्कित बकऱ्या कोंबलेल्या आढळून आल्या. या प्रकरणी मध्यप्रदेशातील भोपाळ येथील तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले .
प्राप्त माहिती नुसार, 3 डिसेंबरला मूर्तिजापूर शहरातील बस स्टँड जवळ सुसाट वेगाने जाणाऱ्या गाडीला पोलिसाने थांबविण्याचा इशारा केला. मात्र कार चालक महामार्गाच्या दिशेने पळून जात होता .संशयावरून पोलिसांनी या कारचा पाठलाग करीत अमरावती जिल्ह्यातील बडनेरा जवळ ही कार अडविली. कारमधील चौघापैकी एक जण येथून पसार झाला. तिघे पकडले गेले .गाडीची पाहणी केल्यावर पोलिसांना चक्क कारच्या डिक्कित चार ते पाच बकऱ्या कोंबलेल्या आढळून आल्या . कार मधील तिघे भोपाळ मध्यप्रदेश येथील रहिवाशी असून ही बकऱ्या चोरणारी टोळी असल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी पोलिसांची पुढील कारवाई सुरू आहे.