राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी वेगाने सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संघटनात्मक बळकटीसाठी महत्त्वाचे बदल करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी जिल्हाध्यक्ष दिलीपराव उर्फ माधवराव धर्माधिकारी (बरबडेकर) यांची अकोला शहर व ग्रामीण जिल्हा समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ही निवड जाहीर करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी धर्माधिकारी यांच्या अनुभवाबद्दल आणि संघटन कौशल्याबद्दल विशेष उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, धर्माधिकारी यांनी पक्ष संघटनेत विविध पदांवर उल्लेखनीय कामगिरी केली असून, कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा दांडगा संपर्क आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं त्यांची नियुक्ती योग्य आहे.
धर्माधिकारी यांच्या निवडीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर, शिवराज पाटील होटाळकर, वसंत पाटील सुगावे यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वागत केले.
कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “धर्माधिकारी यांच्या समन्वयामुळे पक्ष अधिक मजबूत होईल आणि निवडणुकांमध्ये नक्कीच चांगले यश मिळेल.
अकोला शहर आणि ग्रामीण भागातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या खांद्यावर
पक्ष रणनीती,
प्रचार मोहीम,
कार्यकर्त्यांचे समन्वय,
संघटन मजबुती,
कार्यक्रमांचे नियोजन
या सर्व महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आता धर्माधिकारी यांच्या खांद्यावर आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्हा संघटनेत नवा उत्साह, नवीन उमेद आणि सक्रियता निर्माण झाल्याचे पक्षातील वातावरणावरून स्पष्ट होते.
आगामी निवडणुकांमध्ये पक्ष सक्षमपणे उभा राहण्यासाठी अनुभवी नेतृत्वाची आवश्यकता होती, आणि धर्माधिकारी यांच्या निवडीमुळे पक्षाच्या रणनीतीला अधिक धार मिळाल्याचे मानले जात आहे. कार्यकर्त्यांमध्ये या नियुक्तीमुळे उत्साहाची नवी लाट पसरली आहे.