अकोला : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे आज शुक्रवारी (दि. ४) रोजी दुपारी अकोल्यात आगमन झाले. यानंतर त्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला भेट देऊन तेथील पीक प्रात्यक्षिकांची पाहणी केली.
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे आज शुक्रवारी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आगमन झाले. यावेळी जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख व इतर अधिकार्यांनी त्यांचे स्वागत केले. आगमनानंतर राज्यपालांना जिल्हा पोलिस दलाकडून मानवदंना देण्यात आली. तसेच कृषी विद्यापीठालाही भेट दिली.