अकोला : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील घोडेगाव येथील आस नदीकाठी मेंढ्या चारणाऱ्या ८० वर्षीय मेंढपाळाचा नदीचे थांबलेल्या पाण्यात पाय घसरून पडून बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी तेल्हारा पोलीस स्टेशनमध्ये २९ ऑक्टोबर रोजी नोंद करण्यात आली.
प्राप्त माहिती नुसार, मृतकाचे नाव नथ्थू भिकू ठेलारी (८०) रा. पूर्णाल फाटा ता. मुक्ताई नगर, जळगाव खान्देश आहे. या प्रकरणी मृतकाचा मुलगा तुकाराम नथ्थू ठेलारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मृतक नथ्थू ठेलारी मेढ्या चारायला गेले होते.
घोडेगाव येथील आस नदीच्या काठाने परत घरी येताना आस नदीचे थांबलेल्या पाण्यात त्यांचा पाय घसरला व पाण्यात बुडून मृत्यू झाला. अशा तक्रारीवरून तेल्हारा पोलिसांनी २९ ऑक्टोबर पूर्वी घडलेल्या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.