मुंबई येथील समारंभात बालस्नेही पुरस्काराने जिल्हाधिकारी अजित कुंभार यांना गौरविण्यात आले. Pudhari Photo
अकोला

अकोला: बालस्नेही पुरस्काराने जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचा गौरव

Ajit Kumbhar | बाल हक्कासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल

पुढारी वृत्तसेवा

अकोला, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगातर्फे उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून अजित कुंभार यांना बाल हक्कासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबाबत मुंबई येथील समारंभात बालस्नेही पुरस्काराने गौरविण्यात आले.

बाल संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी आणि यंत्रणांचा सन्मान करण्यासाठी मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे मंगळवारी समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री पंकज भोयर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात बालकांच्या हक्कांसाठी विविध योजना राबविण्यात आल्या. बालविवाह प्रतिबंधासाठी कार्यशाळांचे आयोजन, स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने बाल हक्क सप्ताहाचे यशस्वी आयोजन, हरविलेल्या व बालगृहात दाखल बालकांच्या कुटुंबाचा यशस्वी शोध घेऊन त्यांना कुटुंबात पाठविणे, बालकामगार निर्मूलन, कार्यशाळांचे आयोजन, जिल्हा स्त्री रूग्णालयात बालस्नेही कक्षनिर्मिती, त्याचप्रमाणे, शिक्षण हक्क कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

हा पुरस्कार संपूर्ण टीमच्या एकत्रित प्रयत्नांचे फळ आहे. आम्ही भविष्यातही बालकांच्या कल्याणासाठी कार्यरत राहू, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिका-यांनी यावेळी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT