अकोला : शेतकऱ्याची 12 क्विंटल तूर लंपास

Tur theft: बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
Farmer loses tur crop
घटनास्थळी पंचनामा करताना पोलिस.pudhari photo
Published on
Updated on

अकोला : अकोला तालुक्यातील आपातापा येथे शेतकऱ्याच्या घरातील पोर्च मध्ये ठेवलेल्या अंदाजे १२ क्विंटल तूर अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना ३ मार्च रोजी रात्री ३ ते ४ वाजताच्या दरम्यान घडली.

प्राप्त माहितीनुसार , आपातापा येथील प्रमोद बोपटे यांच्या घराच्या पोर्चमध्ये ठेवलेले अंदाजे १५ ते २० कट्टे तूर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. विशेष म्हणजे, चोरट्यांनी तुरीसह दोन पिवळ्या रंगाचे तळवही देखील लंपास केले.

याप्रकरणी प्रमोद बोपटे यांनी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक अनिल गोपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि.मनोज उघडे, पो.कॉ. सुदीप राऊत यांनी घटनास्थळी पंचनामा करून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे .

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news