अकोला, पुढारी वृत्तसेवा : तेल्हारा येथील तलाठी शिलानंद माणिकराव तेलगोटे (वय ३९, रा. गाडेगाव) यांनी एमआयडीसी परिसरातील एका झाडाला दोरीने गळफास घेऊन जीवन संपविले होते. या प्रकरणी तलाठी तेलगोटे यांच्या पत्नीवर १ एप्रिलरोजी तेल्हारा पोलिसांनी हवालदार अमोल सोळंके यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. (Akola Crime News)
प्राप्त माहिती नुसार , मृत तलाठी शिलानंद तेलगोटे मृत्यू प्रकरणी तपास करणाऱ्या पोलीस हवालदार अमोल सोळंके यांना तपासादरम्यान सुसाइड नोट मिळून आली. त्यामध्ये पत्नी कसा छळ करते, ते मांडून तिचा भाऊ प्रवीण गायगोळ यांना शेतीसाठी मी काही रक्कम दिली. माझ्या पगारामधून रक्कम कपात सुरू आहे. माझा चेहरा पत्नीला दाखवू नका, असे त्यांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी प्रतिभा शिलानंद तेलगोटे, व प्रवीण गायगोळ या दोघांविरुद्ध तेल्हारा पोलिसांनी १ एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.