Bappa Org Digital Platform AI
अकोला

Ganeshotsav 2026 | गणेशोत्सव परंपरेचे होणार जागतिक दस्तऐवजीकरण; ‘Bappa.org’ डिजिटल मंच सुरु

‘Bappa.org’ डिजिटल  जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

Digital Platform Bappa Org

अकोला : महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा आणि लोकजीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. या उत्सवाच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी ‘Bappa.org’ हा अधिकृत डिजिटल मंच सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातील गणेशोत्सव परंपरेचे डिजिटल स्वरूपात कायमस्वरूपी दस्तऐवजीकरण करण्यात येणार आहे.

अकोला जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या वैविध्यपूर्ण परंपरांची नोंद होणार

 जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळे, घरगुती गणेशोत्सव तसेच पिढ्यान्‌पिढ्या जपल्या जाणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण गणेशोत्सव परंपरांची या उपक्रमांतर्गत नोंद करण्यात येणार आहे. त्यासोबतच स्थानिक श्रद्धा, प्रथा आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांचेही डिजिटल दस्तऐवजीकरण केले जाणार आहे.

आपल्या गावातील आणि घरातील परंपरा जगासमोर आणण्याची संधी

अकोला जिल्ह्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या गणेशोत्सवाच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरा, प्रथा आणि उत्सवाचे स्वरूप पुढील पिढ्यांसाठी जतन व्हावे, तसेच त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळावी, यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे.

 जिल्ह्यातील नागरिकांनी ‘Bappa.org’ या डिजिटल मंचावर मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या गावातील, घरातील आणि परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण गणेशोत्सवाची माहिती, परंपरा आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांची नोंद करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT