Akot City Police
अकोला : अकोट शहर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहिती वरून एक किलो 457 ग्राम गांजा सह मोटरसायकल जप्त करण्यात येऊन आरोपीला अटक करण्यात आली. ही कारवाई बुधवारी (दि.२९) सकाळी करण्यात आली.
प्राप्त माहिती नुसार ,अकोट शहरात सार्वजनिक रस्त्यावर एक जण गांजाची विक्री करीत आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. या वरून पोलिसांनी सापळा रचला अकोट शहर चे पोलीस निरीक्षक अमोल माळवे, डीबी पथकाचे निलेश बारहाते, व चमू घटनास्थळी गेली असता त्यांना एका थैलीमध्ये एक जण मोटर सायकलला थैली लटकून गांजा विक्री करताना आढळून आला.
त्याचे नाव विचारले असता सुरेंद्र प्रल्हाद बेहतरे वय 48 मोची पुरा नरसिंग रोड आकोट असे त्याने सांगितले.पोलिसांनी 84,700 रुपयांचा ऐवज जप्त केला . आरोपीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास अकोट शहर पोलीस करीत आहे.