House fire Akola
अकोला: पातुर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशनचे हद्दीतील येत असलेल्या उमरा येथे गुरूवारी (दि. 23) दुपारी 1 वाजताच्या सुमारास समाधान चुंदळे व भगवान चुंदळे यांच्या राहत्या घराला आग लागली.
या दुर्घटनेत लाखों रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. सुदैवाने या घटनेत जीवित हानी झाली नाही. या दोन्ही घरातील अन्नधान्य, भांडे व घरातील साहित्य जळाले आहे.
प्राप्त माहिती नुसार, या घटनेची माहिती मिळतात चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र लांडे यांचे मार्गदर्शनाखाली बिट जमादार दिनेश झटाले व पीएसआय म्हात्रे हे घटनास्थळी दाखल झाले.
गावकऱ्यांच्या मदतीने आग नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत या घरातील साहित्य जळून खाक झाले होते. या घटनेचा प्रशासकीय यंत्रणेकडून पंचनामा करण्यात आला आहे. आगीचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही.