Akola Bullock Death Flood  Pudhari
अकोला

Akola Rain | नाल्याच्या पुरात वाहून गेल्याने बैलाचा मृत्यू; मोरगाव सादिजन येथील घटना 

दोन मोबाईल फोन, पाच कपाशीच्या बियाण्यांचे पॅकेट पुराच्या पाण्यात वाहून गेले

पुढारी वृत्तसेवा

Akola Bullock Death Flood

अकोला : बाळापूर तालुक्यातील मोरगाव सादीजन येथील  नाल्याला अचानक आलेल्या पुरात वाहून गेल्याने शेतकऱ्यांचा एक बैल मृत्युमुखी पडल्याची घटना शनिवारी घडली. त्यामुळे शेतकऱ्यांचे 65 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

 प्राप्त माहिती नुसार , शनिवारी दुपारी मोरगाव सादीजन अडोसी, कडोशी, निमकरदा  टाकळी  या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे संपूर्ण परिसरातील नाल्यांना मोठा पूर आला. संध्याकाळी साडेचार पाच वाजता च्या दरम्यान मोरगाव सादीजन येथील शेतकरी सुरेश रामभाऊ अहिर हे त्यांच्या बैलबंडीने नाल्यातून असलेल्या रस्त्यातून घरी येत होते.

त्यावेळी त्यांच्या बैलबंडीत त्याचा मुलगा, पत्नी , तसेच एक महिला शेतमजूर बसलेली होती. हे सर्व घरी येत असताना अचानक नाल्याला मोठा पूर आला. यावेळी बैलबंडीला जुंपलेला एक बैल सोडला परंतु दुसरा बैल व बैलबंडी पुराच्या पाण्यात वाहून गेली.  बैलबंडीतील सर्व सुखरूप असले तरी  दोन मोबाईल फोन,  पाच कपाशीच्या बियाण्याच्या पॅकेट पुराच्या पाण्यात वाहून गेले अशी माहिती सूत्रांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT