अकोला : घरावर स्लॅब टाकण्याचे काम करताना विजेचा शॉक लागून मजुराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.१२) तेल्हारा तालुक्यातील वडगाव रोठे येथे घडली. ओमप्रकाश केशवराव जांभळे (वय १७, रा .वसाडी ता संग्रामपूर) असे या मजुराचे नाव आहे. या प्रकरणी तेल्हारा पोलिसांनी नोंद घेतली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, केशवराव राणू जांभळे ( रा. वसाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वडगाव रोठे येथे घरावर स्लॅब टाकण्याचे काम सुरू होते. येथे ओमप्रकाश जांभळे हा युवक काम करत होता. दरम्यान काम आटोपल्यानंतर बांधकामाचे मिक्सर मशीन बाजूला त्याला विजेचा जोराचा विजेचा शॉक लागला. त्यानंतर त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्या मजुरांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र उपचारपूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.