अकोला - जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील दहीगाव अवताडे येथील शेतकरी विनायक पुंडलिकराव अवताडे शेतातून परत येत असतांना रस्त्यामध्ये असलेल्या नाल्याला अचानक पुराचा लोंढा आल्याने ते १६ जुलैला वाहून गेले. घरी परत न आल्याने त्यांची शोधाशोध घेतली केली असता मृतदेह नाल्यामध्ये १७ जुलै रोजी सकाळी आढळून आला.
दहीगाव येथील शेतकरी विनायक अवताडे हे शेतात गेले होते. शेतातून घरी परत येत असताना अचानक तेल्हारा परिसरात दुपारदरम्यान मोठ्या प्रमाणात पाऊस झाला व दहीगाव नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आला. या पुरामध्ये ते वाहून गेले . घरी न परतल्याने त्यांची शोधाशोध केली याबाबत रात्रीच महसूल विभागाला माहिती देण्यात आली होती. त्यामुळे सकाळी मंडळ अधिकारी, तलाठी, पोलिस पाटील, सरपंच, आपत्कालीन पथक गावात पोहचले होते. शोध घेत असताना गावापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर नाल्यामध्ये शेतकरी विनायक अवताडे यांचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी पोलिस व महसूल विभागाने पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला. त्यांच्यावर गुरुवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.