

Woman Dies from Bike Fall Akola Accident
अकोला: दुचाकीने घरी जात असताना महिलेचा स्टोल दुचाकीच्या चाकात अडकून महिला खाली पडून डोक्याला जबर मार लागल्याने या महिलेचा मृत्यू झाला. ही घटना माळेगाव ते दानापूर रस्त्यावर घडली. दुचाकीने पती पत्नी आपल्या गावी दानापूर येथे जात होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, दानापूर येथील रहिवासी सुनील सुरजुसे हे ५ जून रोजी सकाळी पत्नी सविता सुरजुसे यांच्यासह अकोला येथे लग्नासाठी गेले होते. संध्याकाळी हे दोघे दुचाकीने परत जात होते . माळेगाव ते दानापूर रस्त्यावर दुचाकीवर मागे बसलेल्या सविता सुरजुसे यांच्या गळ्यातील स्टोल मागच्या चाकात अडकला आणि त्या मोटारसायकलवरून खाली पडल्या. त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. यावेळी सुनील सुरजुसे यांनी एसटी बसमधून पत्नीला तातडीने तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, तपासणीअंती वैद्यकीय अधिकारी यांनी या महिलेस मृत घोषित केले. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.