लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ File Photo
अकोला

थेट कर्ज योजनेसाठी करा अर्ज: 'अण्णाभाऊ साठे' महामंडळाचे आवाहन

Annabhau Sathe Corporation | कर्जासाठी २० मार्चपूर्वी अर्ज करा

पुढारी वृत्तसेवा

अकोला, पुढारी वृत्तसेवा : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडून मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील कुटुंबांच्या प्रगतीसाठी थेट कर्ज योजना राबविण्यात येते. दि. २० मार्चपूर्वी अर्ज करून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आनंद वाडिवे यांनी केले आहे.

थेट कर्ज योजनेत १८ ते ५० वयोगटातील व्यक्तींना १ लक्ष रू. मर्यादेपर्यंत कर्ज दिले जाते. जात प्रमाणपत्र, शिधापत्रिका, उत्पन्नाचा दाखला, आधारपत्र, पॅनकार्ड, उद्योग प्रमाणपत्र आवश्यक आहे. उत्पन्न तीन लाखांहून कमी असावे. महामंडळाच्या योजनेचा यापूर्वी लाभ घेतलेला नसावा.

मातंग व तत्सम १२ पोटजातीतील कुटुंबाची सामाजिक व आर्थिक उन्नती, तसेच रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावीत यासाठी महामंडळाकडून सुविधा कर्ज योजना, महिला समृद्ध योजना, शैक्षणिक कर्ज योजना, थेट कर्ज योजना, लघु ऋण वित्त योजना आदी अनेक योजना राबविल्या जातात. त्याचा लाभ समाजबांधवांनी घ्यावा, असे आवाहन वाडिवे यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT