

अकोला, पुढारी वृत्तसेवा : श्री संत गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त शेगाव येथे पायदळ वारी निघते. या पार्श्वभूमीवर वारी मार्गावर जड वाहनांस प्रतिबंध घालण्यात आला आहे. जिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांनी याबाबतचा आदेश निर्गमित केला.
अकोल्याहून डाबकी रस्ता- गायगाव- निमकर्दा- निंबा फाटा, तसेच पारस फाटा ते निमकर्दा या रस्त्यांवर दि. १९ फेब्रुवारी रोजी दु. १२ वा. पासून ते दि. २० फेब्रुवारीच्या सकाळी ७ पर्यंत जड वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद राहील. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.