अकोला : अकोला शहरातील उड्डाणपुलावर टॉवर चौक परिसरात दुचाकीचालकाचे त्याच्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याची रॅलिंगला धडक लागली.या अपघातात दुचाकीचालकाचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची घटना शनिवार, ३ मे रोजी दुपारी घडली.
प्राप्त माहितीनुसार , मध्यप्रदेशातील महू जिल्ह्यातील रहिवासी व अकोला शहरात सिंधी कॅम्प येथे वास्तव्य करणारा संतोष वनवासी हा युवक पाणीपुरीचा व्यवसाय करीत होता.त्याच्या कामानिमित्त तो सिंधी कॅम्प येथून उड्डाणपुलावरून टॉवरकडे जात होता.त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी रॅलिंगला जाऊन धडकली.
या अपघातात त्याचा घटनास्थळी मृत्यू झाला. याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी पंचनामा करून भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी दुचाकीचालकाविरूध्द गुन्हा नोंद केला आहे.