बार्शिटाकळी येथील तिरंग्याचा अवमान प्रकरणी मुख्याध्यापकासह दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल केला आहे.  File photo
अकोला

तिरंग्याचा अवमान प्रकरणी मुख्याध्यापकासह दोन शिक्षकांवर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

अकोला: पुढारी वृत्तसेवा : अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत नियोजित वेळेपेक्षा उशिराने झेंडा उतरविण्यात आला. त्यामुळे तिरंगा ध्वजाचा अवमान झाल्याची तक्रार पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी यांनी पोलिसांत दिली. या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकासह दोन शिक्षकांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील बार्शिटाकळी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत सकाळी फडकविण्यात आलेला तिरंगा ध्वज संध्याकाळी नियोजित वेळी खाली उतरविणे अपेक्षित असताना उशिरापर्यंत शाळेत तिरंगा ध्वज फडकत होता. याबाबत तहसीलदारांना माहिती मिळताच त्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना ध्वज उतरविण्यास सांगितले. अखेर सायंकाळी शासकीय वेळ संपल्यानंतर सन्मानपूर्वक झेंडा उतरविण्यात आला. गटशिक्षणाधिकारी संदीप मालवे यांच्या फिर्यादीवरून मुख्याध्यापकासह दोन शिक्षकांवर बार्शीटाकळी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT