अकोला जाळपोळ, दगडफेकप्रकरणी ३६ संशयितांना अटक करण्यात आली.  (File Photo)
अकोला

अकोला जाळपोळ, दगडफेकप्रकरणी ३६ संशयितांना अटक

पुढारी वृत्तसेवा

अकोला: पुढारी वृत्तसेवा : जुने शहरातील हरिहरपेठ परिसरात वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटात दगडफेकीनंतर दुचाकीसह एका ऑटोची जाळपोळ करण्यात आली. या गुन्ह्यांतील एकूण ३६ आरोपींना जुने शहर पोलिसांनी अटक केली आहे. यातील तीन आरोपींना न्यायालयीन तर, ३३ आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केल्याची माहिती आहे.

जुने शहरातील हरिहरपेठ परिसरात वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटांत दगडफेक व वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. वाहनांची जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली होती. सध्या जुने शहरातील परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात आहे. पोलिसांची प्रत्येक घडामोडीवर नजर आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT