शेतातील सोयाबीनची गंजी अज्ञात व्यक्तीने पेटवून दिली  Pudhari
अकोला

Akola Soybean Crop Fire | ४ एकरातील सोयाबीनची गंजी अज्ञाताने पेटवली

अकोट तालुक्यातील वारुळा येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

Akot Illegal Fire Incident

अकोला : अकोट तालुक्यातील वारुळा येथील शेतकरी महेश रामभाऊ मोहोकार यांच्या ४ एकर शेतातील सोयाबीन ची गंजी अज्ञात व्यक्तीने रात्री 7.30 वाजताच्या दरम्यान पेटवून दिल्याची घटना घडली.

प्राप्त माहितीनुसार, शेतातील सोयाबीन ची  गंजी पेटवली असता त्या गंजी चा धूर व जाळ वारुळा परीसरात दिसत होता. त्यामुळे गावकऱ्यांनी शेताकडे धाव घेतली असता पाण्याच्या अभावामुळे आग विझवू शकले नाही.   पोलीस व अकोट येथील अग्निशमन दलाच्या साहाय्याने गंजी विजविण्यात आली.

घटनास्थळी पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण चे पोलीस, कृषी अधिकारी, तलाठी यांनी जागेवर पंचनामा करून तसा अहवाल तहसीलदार अकोट यांना सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT