प्रातिनिधिक छायाचित्र  file photo
अकोला

अकोला: परप्रांतीय व्यक्तीकडून १० किलो गांजा जप्त

Akola Crime News | परप्रांतीय सिव्हिल लाईन पोलिसांच्या ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

अकोला: पुढारी वृत्तसेवा : अकोला शहरातील  शास्त्री नगर भागात  बिहारच्या व्यक्ती जवळून १० किलो गांजा 31 डिसेंबरला  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला आहे.

 प्राप्त माहिती नुसार,स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त  माहितीवरून  पोलिसांच्या  पथकाने शास्त्री नगर भागात छापा टाकला .या वेळी  दिलशाद खाँ हसीब खाँ , रा. ग्राम डोरीया  जि. पुर्णिया  या  बिहार मधील व्यक्ती जवळून 10 किलो 22 ग्रॅम गांजा किंमत अंदाजे 2 लाख 55 हजार रुपये जप्त करण्यात आला. याप्रकरणी या परप्रांतीय व्यक्तीविरुद्ध कारवाई करून त्यास सिव्हिल लाईन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT