विदर्भ

अकोला : पतीनेच केला पत्नीचा खून, आरोपी अटकेत

backup backup

अकोला, पुढारी वृत्तसेवा : तेल्हारा तालुक्यातील आडसूळ शिवारातील स्वामी ब्रिक्स वीट भट्टीवर मजूर असलेल्या पती-पत्नीतील वाद विकोपाला गेला अन् पतीने पत्नीला जळक्या लाकडाने मारहाण करत खून केला. गुरुवारी (दि.१६) सकाळी साडेआठच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीस अटक केली आहे. सरोजदेवी अरविंद कुमार ( वय ३७, रा.फैजाबाद, उत्तर प्रदेश) असे खून करण्यात आलेल्या पत्नीचे नाव आहे. तर याप्रकरणी पोलिसांनी अरविंदकुमार कांताप्रसाद यास अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे की, तेल्हारा तालुक्यातील आडसूळ शिवारात स्वामी ब्रिक्स नामक विट भट्टीवर मजूर म्हणून काम करणाऱ्या अरविंदकुमार कांताप्रसाद नामक आरोपीने त्याची पत्नी सरोजदेवी अरविंद कुमार जळक्या लाकडाने निर्दयपणे मारहाण केली. या मारहाणीत ती गंभीररित्या जखमी झाली आणि तिचा मृत्य़ू झाला.

दरम्यान, फिर्यादी राम सुधाकर वाकोडे (दिवाणजी, रा.तेल्हारा) याने पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनेची गांभीर्य ओळखून पत्नीचा खून केल्याचा आरोपावरून नमूद आरोपीला अटक केली. आरोपी पती विरोधात तेल्हारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश कायंदे करत आहेत.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT