विदर्भ

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन : बालचित्रकारांनी साकारली वैदर्भीय काव्य नक्षत्रमाला

मोहन कारंडे

वर्धा; पुढारी वृत्तसेवा : ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्‍या आज (दि.४) दुस-या दिवशी स्व. मनोहर म्हैसाळकर स्मृती वैदर्भीय काव्य नक्षत्रमालेत बालचित्रकारांनी वैदर्भीय काव्‍य नक्षत्रमाला साकारली. नागपूरच्या बसोली ग्रुप, स्कूल ऑफ स्कॉलर्स, वि. सा. संघ, नागपूरच्या वतीने हा उपक्रम आयोजित केला होता. यात अनेक कवींच्‍या कविता दृश्यरुपात प्रकट केल्या.

वैद्यर्भीय काव्‍यनक्षत्रमाला या दृश्यचित्र प्रकल्पाचे उद्घाटन सकाळी मुंबईचे प्रसिद्ध चित्रकार विजयराज बोधनकर आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रकाश पायगुंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी बसोलीचे चंद्रकांत चन्‍ने उपस्‍थ‍ित होते. या उपक्रमात विदर्भातील ३० निवडक कवींच्या कविता निवडण्यात आल्या होत्‍या. कवी सुरेश भट, कवी ग्रेस, ना. घ. देशपांडे, विठ्ठल वाघ, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, कवी अनिल, संत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, राम शेवाळकर, प्रफुल्ल शिलेदार, संजय तिगावकर आदींच्‍या कवितांचा यामध्ये समावेश होता. बसोलीच्‍या १५० बालचित्रकारांनी ३० वेगवेगळ्या कॅनव्हासवर सामूहिकपणे कविता दृश्य स्वरूप रंग आणि रेषेच्या माध्यमातून सादर केल्या. विदर्भातील विविध शाळांमधील ५ वी ते ९ वी च्या वर्गातील बालचित्रकार यात सहभागी झाले होते.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT