डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : डोंबिवली येथील एमआयडीसी मिलापनगर परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने नंदी पॅलेस जवळ सुरू असलेल्या बांधकाम साईटवर गळफास घेऊन आत्महत्या केली. संकेत प्रभुभाई पटेल ( वय 26) असे त्याचे नाव आहे. संकेतच्या आत्महत्या करण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
संकेतच्या कुटुंबाचा बांधकाम व्यवसायाशी निगडित व्यवसाय असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. संकेतच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि दोन वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी या संदर्भात माहिती देण्यास नकार दिला.