विवाहितेवर सामुहिक अत्याचार File Photo
ठाणे

धक्कादायक! विवाहितेवर सासरा, दिर व अल्पवयीन नातवाईकाकडून अत्याचार

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण तालुक्यातील टिटवाळ्याजवळच्या एका गावात अत्यंत क्लेशदायक घटना उघडकीस आली आहे. एका विवाहितेवर सासऱ्यासह दिराने व एका अल्पवयीन नातेवाईकाने अत्याचार केल्याचे घटना घडली. त्यानंतर तिने हा प्रकार आपल्या नवऱ्याला सांगितला. त्यानंतर तिच्या संशयखोर नवऱ्याने तिला समजून न घेता तिला दगड- विटांचा मारा करून गंभीर जखमी केले.त्यानंतर विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून सासऱ्यासह दिराला गजाआड करण्यात आले आहे.

घरात कुणी नसल्याची संधी साधून एका विवाहितेवर तिचा ५० वर्षीय सासरा, २२ वर्षीय दीर आणि १६ वर्षीय अल्पवयीन नातेवाईकाने अत्याचार केले. त्यानंतर तिने आपल्यावर घडलेल्या प्रसंगाची माहिती पतीला सांगितली. पती आपल्याला धीर देईल आणि मदत करील, अशी अपेक्षा राहिली दूर, उलट पतीने तिच्यावरच संशय घेतला. काहीही ऐकू न घेता दगड-विटांचा मारा करून तिला जखमी केले. या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या विवाहितेला ठाण्यातील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पोलिसांनी तिची आस्थेवाईकपणे चौकशी केल्यानंतर सारा प्रकार समोर आला. त्यानंतर पोलिसांनी विवाहितेची तक्रार नोंदवत तिच्या सासऱ्यासह दिराला अटक केली. त्यानंतर अल्पवयीन नातेवाईक मुलालाही ताब्यात घेण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT