Sahar Sheikh AIMIM Corporator Pudhari
ठाणे

Who is Sahar Sheikh: मुंब्र्यातील MIMची नगरसेविका सहार शेख कोण आहे? वय, शिक्षण, व्यवसाय आणि संपत्ती जाणून घ्या

Sahar Sheikh AIMIM Corporator: ठाणे महापालिका निवडणुकीत मुंब्र्यातील प्रभाग 30 मधून AIMIMच्या सहार शेख यांनी विजय मिळवला. विजयानंतरच्या भाषणात त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केल्याने त्या चर्चेत आल्या आहेत.

Rahul Shelke

Who is Sahar Sheikh Mumbra Thane AIMIM Corporator

मुंब्रा : ठाणे महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक 30 सर्वाधिक चर्चेत राहिला. या प्रभागातून AIMIM (एमआयएम) पक्षाच्या उमेदवार सहार शेख यांनी विजय मिळवत राजकारणात जोरदार एन्ट्री केली.

त्यांचा विजय जितका लक्षवेधी ठरला, तितकंच त्यांच्या विजयानंतरचं भाषणही चर्चेचा विषय ठरत आहे. भाषणात त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला. त्यामुळे सहार शेख हे नाव राज्यभर चर्चेत आलं.

राजकीय पार्श्वभूमी असलेलं कुटुंब

सहार शेख यांचं कुटुंब राजकारणाशी जोडलेलं आहे. त्यांचे वडील युनूस शेख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून मुंब्रा परिसरात सक्रिय होते आणि ते मुंब्रा ब्लॉक अध्यक्ष म्हणूनही काम करत होते. त्यामुळे यावेळी राष्ट्रवादीकडून त्यांच्या कुटुंबाला उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती.

राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली नाही

सहार शेख यांनी सांगितल्यानुसार, सुरुवातीला त्यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आधी शब्द दिला होता, मात्र नंतर तो शब्द पाळला नाही. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या पक्षातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि AIMIMकडून मैदानात उतरल्या. निवडणुकीत त्यांनी दणदणीत विजय मिळवून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

सहर शेख यांची माहिती (प्रोफाईल)

  • पूर्ण नाव: सहार युनूस शेख

  • वय: 29 वर्ष

  • शिक्षण: बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (BBM), मुंबई विद्यापीठ (2017)

  • व्यवसाय: कार वॉशिंग सेंटर

  • एकूण संपत्ती: अंदाजे 6,98,840 रुपये

  • सोने: 120 ग्रॅम (अंदाजे 12 लाख रुपये)

  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न: 23,43,012 रुपये

मुंब्र्याच्या राजकारणातला नवा चेहरा

मुंब्रा परिसरात स्थानिक पातळीवर राजकारण खूप सक्रिय आहे. अशा ठिकाणी सहार शेख यांनी मिळवलेला विजय महत्त्वाचा मानला जात आहे. नव्या नगरसेविका म्हणून त्या पुढे कोणते मुद्दे घेऊन काम करतात आणि स्थानिक समस्यांवर काय भूमिका घेतात, याकडे आता सर्वांचं लक्ष आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT