ठाणे : सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हीडिओ पोस्ट केल्याने हरवलेल्या वृद्ध महिलेचा शोध लागला आणि माय-लेकाची भेट झाली. मनसे प्रभाग अध्यक्ष संतोष निकम व शाखाध्यक्ष अक्षय आंबेजकर यांना या महिलेचा शोध लागल्यानंतर त्यांनी वर्तकनगर पोलिसांशी संपर्क करून वृद्धेला निवारा केंद्रात ठेवले आणि पुन्हा निकम व आंबेरकर यांनी मनसेच्या व इतर सोशल मीडियावर पोस्ट टाकली.
वर्तकनगर भीमनगरमधील रहिवाशी आनंद बनसोडे याने लासलगावच्या त्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर सदर पोस्ट टाकली. हरवलेल्या 75 वर्षीय वृद्धेचा मुलाने ही पोस्ट पाहिली आणि त्यांनी मनसेचे निकम व आंबेरकर यांच्याशी संपर्क केला. आणि माय-लेकाची भेट घडली.
मुंबईच्या कुर्ला परिसरात राहणार्या व मूळच्या लासलगावच्या या आजी रस्ता विसरल्याने भरकटल्या व थेट ठाण्यात पोहोचल्या. वृद्ध महिला निकम व आंबेजकर यांना दिसली. वृद्धा लासलगांव येथील असल्याने ती पोस्ट ग्रामस्थांनी वृद्धेच्या मुलाला विलास गांगुर्डेला पाठविली. या माध्यमातून मुलगा वर्तकनगर पोलीस ठाण्यात पोहोचला आणि आपल्या वृद्ध आईला भेटला.