ठाणे : विशाळगड येथील शिवकालीन गावात घडलेली दंगल, लुटमार ही सरकार पुरस्कृत होती, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने भाजपने हिंदू-मुस्लिम असा धार्मिक, जातीय वाद पेटविण्यास सुरुवात केली आहे. त्यातून विशाळगड येथे दंगल झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे ज्या गावात राहिले तिथे ३५० वर्षा पासून कधीच काही घडले नव्हते. सर्वजण एकजुटीने सण साजरे करीत होते. अचानक बाहेरील दरोडेखोर आले आणि दंगल करीत लुटमार केली. ही दंगल सरकारने घडविली असून त्याचे पुरावे माझ्याकडे असल्याचा दावा आव्हाड यांनी केला आहे.
१४ जुलै रोजी विशाळगड अतिक्रमण मुक्ती आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. आंदोलकर्त्यांनी वस्तीला टार्गेट करत घरांचे, गाड्यांचे, मशिदीचे, अतोनात नुकसान केले होते. यानंतर विशाळगडावर अतिक्रमण काढण्याची जिल्हा प्रशासनाची मोहीम राबविली.