Jail Pudhari
ठाणे

Vinayak Raut Family Case: भोंदूबाबा फिरोजचा साथीदार अटकेत

फिरोज बाबाला दोन दिवसांची वाढीव पोलिस कोठडी सुनावली.

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: शिवसेना उबाठा गटाचे माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा गितेश राऊत आणि इतर सात जणांविरोधात त्यांची सून गिरीजा राऊत यांनी गंभीर आरोप करीत कापूरबावडी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणात राऊत पिता-पुत्रासह चौघांनी अटकपूर्व जामिनासाठी ठाणे सत्र न्यायालयात अर्ज दाखल केले आहेत. त्यांच्या अर्जावर २३ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

दरम्यान, या प्रकरणात अटकेत असलेल्या फिरोज बाबाची पोलिस कोठडी संपल्याने त्यास मंगळवारी ठाणे न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने फिरोज बाबाला दोन दिवसांची वाढीव पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान शेख बाबाचा साथीदार रामा वडार याला ठाणे पोलिसांनी मंगळवारी सावंतवाडी येथे येऊन अटक केले.

या गुन्ह्यात सातजणांना आरोपी करण्यात आले असून त्यात राऊत पिता-पुत्रांसह दोन भोंदूबाबांचा देखील समावेश आहे. दरम्यान, गुन्हा दाखल होताच या प्रकरणातील आरोपी व भोंदू बाबा फिरोज शेख यास ठाणे पोलिसांनी शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलगाव येथून अटक केली आहे. त्यास न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. बाबाची पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यास मंगळवारी पुन्हा न्यायालयात हजर केले.

यावेळी कापूरबावडी पोलिसांनी आरोपी फिरोजची सात दिवसांच्या वाढीव पोलिस कोठडीची मागणी केली. अटकेतील फिरोज बाबाचा साथीदार राम यल्लाप्पा वडार याला सिंधुदुर्गातून ताब्यात घेण्यात आले असून दोघा आरोपींची चौकशी करायची असल्याने फिरोजची कोठडी सात दिवसांची वाढवावी अशी मागणी पोलिसांनी केली. न्यायालयाने पोलिसांची बाजू समजून घेतल्यानंतर आरोपी फिरोजला दोन दिवसांची वाढीव पोलिस कोठडी सुनावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT