ठाणे : मध्य रेल्वे प्रशासनाने गेल्या 2 वर्षांअगोदर उभारलेल्या नेरूळ, सीबीडी बेलापूर उरण कॉरिडॉर रेल्वे मार्गावर अलीकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या अगोदर या रेल्वे मार्गावर काही मोजकेच प्रवासी प्रवास करायचे, मात्र अलीकडे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा हाच आकडा तब्बल 24 लाखांवर पोहोचला आहे. दर दिवशी बहुतांश नोकरदार, चाकरमानी आणि इतर विद्यार्थी मोठ्या संख्येने या मार्गावरून प्रवास करत आहेत.
मध्य रेल्वे प्रशासनाने 12 जानेवारी, 2024 साली, उरण कॉरिडॉर रेल्वे मार्गाचे अनावरण करून नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिले होते. उरण येथे असलेल्या मोठ्या औद्योगिक क्षेत्रात कामानिमित्त नेहमीच नेरूळ आणि सीबीडी बेलापूर या रेल्वे स्थानकातून बहुतांश नोकरदार वर्ग चाकरमानी प्रवासी प्रवास करतात सुरू केल्यानंतर काही काळाने प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढल्याने मध्य रेल्वे प्रशासनाने 2024, सालच्या अखेरीस व 2025 मध्ये उरण कॉरिडॉर या रेल्वे मार्गावरील लोकल रेल्वे सेवांची संख्या वाढवली होती. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या उरण-नेरूळ आणि उरण-सीबीडी बेलापूर या रेल्वे मार्गावर या अगोदर सुमारे 8 ते 10 लाख प्रवासी नियमित प्रवास करायचे. या रेल्वे मार्गावरून नियमित प्रवाशांचा आढावा घेताना हाच आकडा वर्षाच्या सुरुवातीस 24 लाखाहून जास्त झाला आहे.
या पार्श्वभूमीवर काही प्रवाशांच्या म्हणण्यानुसार या रेल्वे मार्गावर लोकल रेल्वे सेवा कमी असून निर्धारित वेळेपेक्षा उशिराने प्रवास करत असतात मध्य रेल्वे प्रशासनाने 2025 मध्ये या रेल्वे मार्गावर तब्बल 12 लोकल रेल्वे सेवा वाढवल्या होत्या; परंतु अलीकडे वाढत्या प्रवाशांच्या तुलनेत या विशिष्ट लोकल रेल्वे सेवा कमी पडत आहेत. मध्य रेल्वे प्रशासनाने या स्थितीचा आढावा घेऊन या मार्गावरील नियमित प्रवास करणाऱ्या लोकल रेल्वे सेवांच्या संख्येत वाढ करावी, अशी प्रवाशांची आग्रही मागणी आहे.