Water Supply  file photo
ठाणे

Ulhasnagar Water Supply | दिवाळीत उल्हासनगरकरांना मोठा दिलासा; प्रस्तावित 36 टक्के पाणी कपात मागे

प्रस्तावित 36 टक्के पाणी कपात 24 टक्क्यांवर आणण्याची महापौरांची मागणी मान्य, दिवाळीनंतरच कपात करण्यास मंत्री उदय सामंत यांची सकारात्मक भूमिका

पुढारी वृत्तसेवा

Proposed Water Cut Withdrawn Ulhasnagar

उल्हासनगर : दिवाळीच्या सणात उल्हासनगरकरांना पाणी कपातीपासून मोठा दिलासा मिळणार आहे. शहरात प्रस्तावित पाणी कपात दिवाळीनंतर लागू करावी आणि 36 टक्के प्रस्तावित कपात कमी करून 24 टक्के करावी, अशी मागणी महापौर ॲड. अश्विनी कमलेश निकम यांनी मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली होती. या मागणीला मंत्री सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.       

दिवाळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण असल्याने या काळात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी महापौरांनी दिवाळीच्या कालावधीत पाणी कपात लागू करू नये, अशी आग्रही विनंती केली होती. तसेच प्रस्तावित पाणी कपातीचे प्रमाण कमी करण्याची मागणीही त्यांनी केली.

महापौरांच्या मागणीला मंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक मान्यता दिल्याने दिवाळीच्या सणात उल्हासनगरकरांना पाणी कपातीच्या संकटातून मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयासाठी महापौर ॲड. अश्विनी कमलेश निकम यांनी मंत्री उदय सामंत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT