Ulhasnagar Ganja Seizure pudhari photo
ठाणे

Thane Crime : उल्हासनगरमध्ये १४ किलो गांजा जप्त

उत्तर प्रदेशमधील दोन गांजा तस्करांना अटक; ८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पुढारी वृत्तसेवा

उल्हासनगर : उल्हासनगरमध्‍ये मध्यवर्ती पोलिसांनी कारवाई करत सुमारे १४ किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील दोन तरुणांना अटक करण्यात आली असून गांजा आणि दोन मोबाईल फोन असा एकूण अंदाजे ८ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार प्रशांत धुळे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की उल्हासनगर मधील कॉलेजसमोरील उद्योग विहार कंपाऊंड परिसरात, विठ्ठलवाडी स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन इसम गांजा विक्रीसाठी येणार आहेत.

या माहितीच्या आधारे पोलीस उपायुक सचिन गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त शंकर औताडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस निरीक्षक शीतल बामणे, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब कोबरणे तसेच पोलीस अंमलदार सुभाष सूर्यवंशी, जितेंद्र चौधरी, किशोर काळे, प्रशांत धुळे आणि अनिल घुले यांच्या पथकाने बुधवारी सकाळी सापळा रचला. यावेळी दोन इसम गांजासह आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

सौरभ आणि आकाश अशी आरोपींची नावे असून दोघेही उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत. त्यांच्याकडे असलेल्या बॅगची झडती घेतली असता सुमारे ७ लाख रुपये किमतीचा १४ किलो गांजा आणि दोन मोबाईल फोन असा एकूण अंदाजे ८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT