Beer Shop Burglary Ulhasnagar Pudhari
ठाणे

Ulhasnagar Robbery | बिअर शॉप फोडणाऱ्या तीन चोरट्यांना दोन तासांत अटक, 10 हजारांची रोकड हस्तगत

सीसीटीव्ही फुटेज आणि पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे प्रकरणाचा छडा

पुढारी वृत्तसेवा

Beer Shop Burglary Ulhasnagar

उल्हासनगर : उल्हासनगरमधील फॉलोवर लेन परिसरात असलेल्या एन.एच. बिअर पॉईंटमध्ये शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास चोरीची घटना घडली. दुकान बंद झाल्यानंतर तीन चोरट्यांनी संधी साधत शटर उचकटलं आणि त्यापैकी एकाने दुकानात प्रवेश केला.

दुकानातील काउंटरमध्ये ठेवलेली १० हजार रुपयांची रोकड आणि बिअरच्या सहा बाटल्या घेऊन चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. चोरीचा हा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

दरम्यान, दुकानाचे मालक निखिल चावला यांच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच मध्यवर्ती गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या दोन तासांत तिन्ही चोरट्यांना बेड्या ठोकल्या.

आरोपींकडून चोरीची १० हजार रुपयांची रोकडही हस्तगत करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे बिअर शॉप चोरी प्रकरणाचा छडा अवघ्या दोन तासांत लागला आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT