सुरेखा सोनावणे आणि विकास खरात यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन आपल्या पाठिंब्याचे पत्र त्यांच्याकडे सुपूर्द केले Pudhari
ठाणे

Ulhasnagar Mayor Election: उल्हासनगरमध्ये ट्विस्ट; वंचितच्या पाठिब्यावर उल्हासनगरात शिवसेनेचा महापौर?

सुरेखा सोनावणे आणि विकास खरात यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन आपल्या पाठिंब्याचे पत्र त्यांच्याकडे सुपूर्द केले

पुढारी वृत्तसेवा

VBA support to Shiv Sena

ठाणे : उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत वंचितकडून निवडून आलेले सुरेखा सोनावणे आणि विकास खरात या दोन नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेऊन आपल्या पाठिंब्याचे पत्र त्यांना सुपूर्द केले. यावेळी कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हेदेखील उपस्थित होते. त्यामुळे महापौर बनविण्याचा वाटेवर सेनेने एक पाऊल पुढे टाकल्याचे दिसत आहे.

उल्हासनगर पालिकेतील.७८ जागांपैकी शिवसेना आघाडी ३६ आणि भाजप आघाडीने ३७ जागा जिंकल्या आहेत. बहुमतासाठी ४० जागांची गरज आहे. ह्या जागा वंचित, काँग्रेस आणि अपक्षांच्या मदतीने भरुन निघणार आहे. शिवसेनेने अगोदरच दोन अपक्षांचा पाठिंबा मिळविला आहे. आता वंचित बहुजन आघाडीच्या दोन नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून पाठिंबा जाहीर केल्याने बहुमताचा जादुई आकडा गाठला गेला आहे.

आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच दलीत वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून आपल्या प्रभागातील कामे करण्यात यावीत यासाठी हा पाठिंबा देत असल्याचे त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले. यावेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी आणि नगरसेवक योगेश जानकर, प्रवक्ते राहुल लोंढे हेदेखील यावेळी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT