Budget Pudhari
ठाणे

Ulhasnagar Municipal Corporation: उल्हासनगर महापालिकेचा 1504 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर; विद्यार्थिनींसाठी 500 रुपयांची शिष्यवृत्ती योजना

ज्योती कलानी यांच्या नावावरून भाजप-शिवसेना वाद; महासभेत उशिरापर्यंत चर्चा

पुढारी वृत्तसेवा

उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेच्या सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचे 997.23 कोटी रुपयांचे मूळ अंदाजपत्रक बुधवारी महासभेत आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी सादर केले होते. त्याला तब्बल 500 कोटी रुपयांनी फुगवत 1504 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प महासभेत एक मताने रात्री उशिरा पर्यंत चाललेल्या महासभेत मंजूर करण्यात आला. या अर्थसंकल्पात इयत्ता सातवी ते बारावीच्या विद्यार्थिनींसाठी आणली प्रतिमहा 500 रुपये शिष्यवृत्ती योजना महापौर अश्विनी निकम यांनी जाहीर केली. मात्र योजनेला माजी आमदार ज्योती कलानी यांचे नाव दिल्याने भाजपने त्याला विरोध केला.

Gadchiroli Naxal Surrender: हिंसेचा मार्ग सोडून विकासाकडे; 794 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून सुरू केले नवे आयुष्यदुपारी बारा वाजता सुरू झालेली पालिकेची अर्थसंकल्पीय महासभा ही विविध स्थानिक मुद्द्यांवर नगरसेवकांनी जोरदार मते मांडल्यामुळे चांगलीच लांबली. समाज मंदिराच्या 500 रुपये भाड्या बाबत भाजप नगरसेविका मीना आयलानी यांनी भूमिका स्पष्ट केली. या निर्णयाला शिवसेनेचे मीना सोंडे आणि जमनू पुरस्वानी यांनी पाठिंबा दर्शविला. दरम्यान, शिवसेना नगरसेवक महेश सुखरामाणी यांनी समाज मंदिराच्या वापराबाबत गंभीर आक्षेप घेतले. योग केंद्र म्हणून वापर बंद झाल्याचे सांगत, रात्री उशिरापर्यंत डीजे वाजवणे, कार्यक्रमानंतर दारू पार्ट्या होणे आणि बाहेरील व्यक्तींकडून ऑनलाइन बुकिंग करून उपद्रव वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच वॉर्डमध्ये असल्याने देखभाल खर्च आम्हालाच करावा लागतो, मात्र उत्पन्न महापालिका घेते, अशी खंत मीना आयलानी यांनी व्यक्त केली.

उल्हासनगर कॅम्प 3 मध्ये एकच जलतरण तलाव असून तोही बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्त्वावर देण्यात आला आहे. त्यामुळे कॅम्प 4 आणि 5 परिसरातील नागरिकांसाठी स्विमिंग पूल उभारण्याची मागणी भाजप नगरसेवक शेरी लुंड यांनी केली. स्विमिंग हा उत्तम व्यायाम असून पाठीच्या कण्याच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असल्याचे त्यांनी सांगितले. कॅम्प 5 मधील समता नगर समोर असलेल्या एमजेपी प्लॉटवर स्विमिंग पूल व व्यायामशाळा उभारावी, अशी मागणी भारिपचे नगरसेवक विकास खरात यांनीही केली. उद्यानांच्या देखभालीसाठी माळी व सुरक्षा रक्षक नेमण्याची गरज दिलीप गायकवाड यांनी मांडली. यावर महापौर अश्विनी निकम यांनी अर्थसंकल्पात यासाठी तरतूद केल्याचे स्पष्ट केले.

शिक्षण मंडळासाठी 50 कोटी, डॉग शेल्टरसाठी 5 कोटी, झुलेलाल मार्केटसाठी 1 कोटी, महापालिका शाळांमध्ये सोलर पॅनल, उद्याने आणि रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती राजेश वधारिया यांनी दिली. अग्निशमनासाठी 8 कोटींचे बहुमजली इमारतीला आग लागल्यास फायर ब्रिगेड साठी आधुनिक वाहन, रुग्णालयांसाठी 2 कोटींची तरतूद, तसेच स्मशानभूमीत सुविधा उभारण्याचे प्रस्ताव सभागृह नेता अरुण अशान यांनी मांडले. एकूणच, अर्थसंकल्पात विविध विकासकामांसाठी तरतूद करण्यात आली असली तरी मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर नगरसेवकांनी प्रशासनाला जाब विचारला.

ज्योती कलानी यांच्या नावाला भाजपचा विरोध

उल्हासनगर महापालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत शिवसेना आणि भाजप यांच्यात शिष्यवृत्ती योजनेवरून जोरदार वाद झाला. इयत्ता सातवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना दरमहा 500 रुपये शिष्यवृत्ती देण्याची योजना जाहीर करण्यात आली. या योजनेला महापौर अश्विनी निकम यांनी स्वर्गीय आमदार ज्योती कलानी यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. मात्र, या नामकरणाला भाजपचे गटनेते राजेश वधारिया यांनी कडाडून विरोध दर्शविला. त्यांनी या योजनेला महान शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्याची मागणी केली. यावर शिवसेना नगरसेवकांनी भूमिका स्पष्ट करत, ही योजना महापालिका स्तरावर प्रथमच राबवली जात असल्याने स्वर्गीय ज्योती कलानी यांचे नाव देणे हे त्यांच्या कार्याला अभिवादन असल्याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT