Ulhasnagar Crime pudhari photo
ठाणे

Ulhasnagar Crime : हरेश गजवानी हत्याप्रकरणी तीन आरोपी अटकेत

तिन्ही आरोपींना 10 दिवसांची पोलीस कोठडी; पूर्व वैमनस्यतून हत्या

पुढारी वृत्तसेवा

उल्हासनगर :उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील लालचक्की रस्त्यावर रिक्षा रांगेजवळ गोळीबार करून हरेश गजवानी ऊर्फ शहाणी याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास घडली होती. अविनाश नायडू याने हरेशवर गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती समोर आली.

डोक्यात दोन गोळ्या लागल्याने हितेशचा जागीच मृत्यू झाला. या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना न्यायालयाने 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अविनाश नायडू, विजय पुरणसिंग आणि नूर आलम अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

बुधवारी रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास उल्हासनगर पूर्व रेल्वे स्टेशन परिसरातील लालचक्की रिक्षा रांगेजवळ हरेश गजवानी याच्यावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात त्याच्या पोटावर 10 ते 12 वार करण्यात आले, तसेच छातीत एक गोळी झाडण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली.

या हल्ल्यात हरेशचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे उल्हासनगर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विठ्ठलवाडी पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामदास मिसाळ, गणेश भाबड, पोलीस अंमलदार सुजित निचिते, हरिश्चंद्र घाणे, दिलीप चव्हाण, राजेश कापडी, दीपक पाटील, सुनील गावित, प्रदीप बुरकुल, मंगेश वीर, सागर मोरे, संतोष सांगळे आणि चंद्रकांत गायकवाड यांच्या पथकाने अंबरनाथ एमआयडीसी परिसरात सापळा रचला. या कारवाईत तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले.

अविनाश नायडू, विजय पुरणसिंग आणि नूर आलम अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अटकेनंतर तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या कोठडीदरम्यान हत्येमागील नेमके कारण, गुन्ह्यात वापरण्यात आलेले शस्त्र, हल्ल्यातील प्रत्येक आरोपीची भूमिका आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत पोलीस तपास करणार आहेत.

हरेश गजवानीच्या ट्विटमुळे चर्चेला उधान

उल्हासनगर शहरातील मटक्याचे धंदे, गुटखाची तस्करी आदी बेकायदेशीर धंदा विरोधात हरेश गजवानी हा ट्विटर, फेसबुक आदी समाज माध्यमांवर पोलीस विभागाला तक्रारी करत असे. या तक्रारीमुळे त्याला जीवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. त्यामुळे घाबरलेल्या वारंवार सोशल मीडियावर माझी हत्या झाल्यास त्याला पोलीस विभाग तथा बेकायदेशीर धंद्यावाले जबाबदार असतील अश्या आशयाच्या पोस्ट टाकल्या होत्या. याबाबत पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांना विचारले असता त्या बाजूनेही तपास केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT