संबधित मुलीच्या आईला पोलिसांनी घेतले ताब्यात  
ठाणे

Ulhasnagar Crime: प्रेमसंबंधाला विरोध! आईने आधी समजावलं, मग रागाच्या भरात मुलीचा घेतला जीव; उल्हासनगरात खळबळ

उल्हासनगर कॅम्प 2 येथील भैय्यासाहेब आंबेडकर नगर परिसरातीज घटना, उल्हासनगर पोलिसांत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प 2 येथील भैय्यासाहेब आंबेडकर नगर परिसरात प्रेमसंबंधाच्या कारणातून आईनेच आपल्या २० वर्षीय मुलीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात आईविरोधात गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे.   

     अमृता दत्ता गरड (वय २०) ही भैय्यासाहेब आंबेडकर नगर येथे कुटुंबासह राहत होती. अमृताचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याची चर्चा असून, या संबंधांना तिच्या आईचा विरोध होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दरम्यान, रात्री दोन वाजताच्या सुमारास तिची आई आशा गरड ही घरातील हॉलमध्ये मुलीला समजावत होती. मात्र ती तिच्या निर्णयावर ठाम होती. अखेर चिडलेल्या आईने अमृताचा गळा आवळून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अमृताचा काका उमेश गरड यानी सकाळी सुमारे आठ वाजता अमृताचा मृतदेह मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला.     

  घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर पोलिसांनी तपास सुरू केला. याप्रकरणी आईविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आशा गरड हिला अटक करण्यात आली आहे. हत्येमागील नेमके कारण आणि घटनेचा संपूर्ण तपशील जाणून घेण्यासाठी पोलीस पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT