उल्हासनगर : मित्रावर गुन्हा दाखल केल्याचा रागातून घरावर पेट्रोल टाकत जाण्याचा प्रयत्न केल्याची घटना उल्हासनगर मध्ये घडली आहे. याप्रकरणी सराईत गुन्हेगार काली सिंग लबाना व सुरज शुक्ला या दोघांना मध्यवर्ती पोलिसांनी अटक केली आहे.
उल्हासनगर कॅम्प 3 मधील जसलोक शाळेजवळ विजय सकट व्यापारी राहतात. त्यांनी काही दिवसांपूर्वी ओम राजपूत विरोधात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा राग मनात धरून रोहन रेडकर, सुनिल उर्फ काली सिंग लबाना, सुरज शुक्ला यांनी विजय सकट यांचे घर रात्रीच्या सुमारास गाठले. सकट यांच्या राहत्या घरावर बियर बाटल्या मध्ये पेट्रोल भरून घरावर फेकुन आग लावुन घर नष्ट करण्याच्या इरादयाने आग लावली. त्यामुळे सकट कुटूंबियांसह शेजारी राहणाऱ्या लोकांच्या घराला जिवास धोका निर्माण झाला होता.
या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात रोहन रेडकर, सुनिल उर्फ काली सिंग लबाना, सुरज शुक्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या माहितीच्या आधारे मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर अवताडे, पोलिस निरीक्षक तुकाराम पादिर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश शेवाळे, पोलिस उप निरीक्षक सौरभ मालशेटे, पोलिस अंमलदार प्रमोद जाधव, सूर्यवंशी, जितू चौधरी, कृपाल शेगडे सुशांत हांडे देशमुख, प्रशांत धुळे, किशोर काळे, निलेश नागरे यांच्या पथकाने सापळा रचून डी मार्ट परिसर कल्याण अंबरनाथ रोड येथे पळून जात असताना अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.