दिवा : दिवा शहरात परप्रांतीय अल्पवयीन मुलासह एका टोळक्याकडून दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात अभिषेक पाटील (वय 22) याचा मृत्यू झाला असून सुमित गावडे (वय 22) हा गंभीर जखमी आहे.
ही घटना गणेश नगर, गणेश पाडा, दिवा पूर्व येथे रात्री सुमारे 9.15 वाजता घडली. गेल्या महिनाभरातील अशी ही दुसरी घटना असल्याने परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुख्य आरोपी ऋतिक दुबे हा अल्पवयीन असून त्याच्यासह एकूण 7/8 जणांनी या दोघांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या अभिषेक पाटीलला तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. तर सुमित गावडे याच्यावर उपचार सुरू आहेत.
प्रकरणी काही आरोपी फरार असून ऋतिक दुबे सह 7/8 जणांना दिवा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे प्रकरण मुंब्रा पोलीस स्टेशन हद्दीत नोंदवण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. दिव्यात परप्रांतीय गुन्हेगारांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलिसांकडून उर्वरित कारवाई सुरु आहे. तसेच दुपारच्या दरम्यान हल्ला झालेल्या ठिकाणी फॉरेंसिंक व्हॅन येऊन तपासणी करुन गेली.