KDMC Pudhari
ठाणे

KDMC Property Tax Department : कामात हलगर्जीपणा करणाऱ्या दोन लिपिकांचे तत्काळ निलंबन

केडीएमसी प्रशासनाचा आक्रमक पवित्रा; मालमत्ता कर थकबाकीदारांनाही आयुक्तांचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

कल्याण/डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाशी संबंधित 9/आय प्रभागात असलेल्या अरविंद काळण आणि राजेंद्र पाटील या दोघा लिपिकांवर कामात हलगर्जीपणा केल्याच्या आरोपाखाली निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने केडीएमसी वर्तुळात खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त अभिनव गोयल यांनी मालमत्ता कर थकबाकीदारांना कडक इशारा दिला आहे.

मालमत्ता कर वसूलीच्या उद्दिष्ट्यपूर्तीसाठी कर निर्धारक व संकलन विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमार्फत अथक प्रयत्न करण्यात येत आहेत. मंगळवारी आयुक्त अभिनव गोयल यांनी कर वसूलली संदर्भात समक्ष महानगरपालिकेच्या 9/आय अंक 10/इ प्रभागांना अचानक भेट दिली.

यावेळी दोन्ही प्रभागांच्या सहाय्यक आयुक्तांसह कर अधिक्षक व कर विभागातील भाग लिपिकांसमवेत कर वसूलीबाबत सविस्तर बैठक घेतली. आयुक्तांनी कर वसूलीच्या सद्य:स्थितीबाबत एकंदर आढावा घेतला.

सदर बैठकीत भाग लिपिकांशी केलेल्या चर्चेअंती अत्यंत कमी प्रमाणात कर वसूलीस जबाबदार असलेल्या 9/आय प्रभागातील भाग लिपिक अरविंद काळण आणि राजेंद्र पाटील यांच्यावर कामातील हलगर्जीपणाबाबत तातडीने निलंबनाची कारवाई केली.

शिवाय कर वसूलीच्या उद्दिष्ट्यपूर्तीसाठी अधिक गांभीर्याने काम करण्याबाबत उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सक्त निर्देश दिले. याच वेळी कर वसूलीसाठी प्रभागात पाहणी करत असताना कर लावण्यास अटकाव करणाऱ्या 4 अनधिकृत अनिवासी मालमत्तांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

निष्काळजीपणा केल्यास कारवाई अटळ

माहे मार्च हा कर संकलनाचा या आर्थिक वर्षातील शेवटचा महिना आहे. कर चुकवेगिरी करणाऱ्यांसह कर वसूलीच्या कामात जाणीवपूर्वक निष्काळजीपणा दाखविणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर देखिल कडक कारवाई केली जाईल, असा इशारा अतिरिक्त आयुक्त -2 योगेश गोडसे यांनी दिला आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, कर विभागाचे उपायुक्त बाळासाहेब चव्हाण हे दोन्ही अधिकारी आयुक्त अभिनव गोयल यांच्यासमवेत उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT