वाशी : टँकरमधून डिझेलची चोरी करण्यात येत होती. ही चोरी शिधावाटप अधिकाऱ्यांनी पकडून पाच जणांना ताब्यात घेतले.  pudhari photo
ठाणे

Thane Crime : डिझेल चोरी; शिधावाटप विभागाची कारवाई

९४ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

वाशी : तुर्भे एमआयडीसी परिसरात डिझेल चोरी प्रकरणी शिधावाटप विभागाने कारवाई करून ९४ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन्ही टँकरचे चालक-मालक यांच्यासह अवैध व्यवसायाचे मालक समीर सरोज अन्य पाच जणांविरुद्ध तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

नियंत्रक शिधावाटप संचालक चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनियंत्रक शिधावाटप गणेश बेल्लाळे यांच्या पथकातील अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. या कारवाईमुळे बेकायदेशीर इंधन चोरी व साठेबाजी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

डिझेल पदार्थांची वाहतूक करणाऱ्या टँकर क्रमांक डब्ल्यू बी १९ एल २९८१ च्यावरील टॅंकच्या आउटलेटमधून अवैधरित्या डिझेल काढून टँकर क्रमांक एम ४६ बीएम ९२०२ या टँकरच्या इंधन टाकीमध्ये टाकत असताना धाड टाकण्यात आली.

या कारवाईदरम्यान दोन टँकरसह टँकरमध्ये असलेला सुमारे १४ हजार लिटर डिझेल व २५ हजार लिटर पेट्रोलियम सदृश्य द्रवपदार्थ जप्त करण्यात आला. यावेळी पथकामध्ये बेलापूर शिधावाटप कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT