FDA Raid Pudhari
ठाणे

FDA Raid: आयुक्तपदी तुकाराम मुंडे येताच अन्न प्रशासनाला आली जाग

एकाच दिवसात ठाणे जिल्ह्यातून 7 लाख 30 हजारांचा संशयास्पद अन्न मालाचा साठा जप्त

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: शिस्तशीर आणि धडाकेबाज प्रशासकीय आधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंडे यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागात रूजू झाले आहेत. तुकाराम मुंडे आयुक्तपदी रूजू होताच अन्न आणि औषध प्रशासनाच्या थंडावलेल्या कारभाराला गती मिळाली आहे.

अन्न आणि औषध प्रशासनाच्या ठाणे विभागाने एकाच दिवसात ठाणे जिल्ह्यातील ठाण्यासह, नवी मुंबई, उल्हासनगर आणि रबाळे येथील अन्न आस्थापनावर धाडी टाकून सुमारे 7 लाख 30 हजार रूपयांचा संशयास्पद खाद्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अनेक अन्न व्यावसायिकांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 1,49,724 रुपयांचे खाद्यतेल, 93,830 रुपयांचे फरसाण, 2,06,800 रुपयांचे तूप, 8,190 रुपयांचे हक्का नुडल्स, 17,100 रुपयांची ताडी, 54,096 रुपयांचे शरबत आणि 1,97,640 रुपये किंमतीच्या डिंकाचा (गम अरेबिक) समावेश आहे.

याशिवाय, याच दिवशी प्रतिबंधित अन्न पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून 4,53,344 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अन्न व औषध प्रशासनाने सर्व अन्न व्यावसायिकांना अन्न सुरक्षेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आणि स्वच्छता राखण्याचे कडक आवाहन केले आहे. नागरिकांना अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत काही तक्रार असल्यास त्यांनी प्रशासनाचा टोल फ्री क्रमांक 1800222365 वर संपर्क साधावा किंवा वागळे इस्टेट, ठाणे येथील सह आयुक्त कार्यालयात लेखी तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT