Arrested Pudhari
ठाणे

Titwala terror plot: टिटवाळ्यातही दोन संशयित दहशतवादी अटकेत

लाल किल्ल्यावर स्फोट घडविण्याचा कट गजवा ए हिंदने केला होता.

पुढारी वृत्तसेवा

  • कुर्ला आणि टिटवाळ्यात उघडकीस आलेल्या स्लिपरसेलची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. घातपातासाठी हे संशयित रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्या खेळण्यातल्या कारचा वापर करणार असावेत. कुर्ल्यातील संशयितांकडून अशी आरसी कार जप्त करण्यात आली असून डिटोनेटरही हाती लागल्याचे समजते.

ठाणे / खडवली: दिल्लीचा लाल किल्ला उडवून देण्याच्या कटात सहभागी असलेल्या दोन दहशतवाद्यांना टिटवाळा येथून दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले. मोहसीद इफ्तिकार आणि यासिन खान अशी या दोन संशयितांची नावे आहेत. लाल किल्ल्यावर स्फोट घडविण्याचा कट गजवा ए हिंदने केला होता.

फेब्रुवारी २०२६ मध्ये तो उधळून लावण्यात आला. या कटात सहभागी असलेल्या काहींना कुर्ला येथून ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यापाठोपाठ टिटवाळा-खडवलीत ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून काही संशयास्पद साहित्यही ताब्यात घेण्यात आल्याचे समजते. या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर भारतातील महत्त्वाची मंदिरेही होती. मोहसीद आणि यासिन यांच्या चौकशीतून त्यांचे साथीदारही हाती लागण्याची शक्यता आहे.

या कटात तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधून ८ संशयितांना आधीच अटक झाली आहे. त्यांचे संबंध जैश ए मोहंमद आणि आयएसआयशी असल्याचे तपासात पुढे आले आहे. यापूर्वी दहशतवादी कारवाया करणाऱ्या संशयितांना पडघा बोरिवली येथून एटीएसने ताब्यात घेतले होते. आता अशाच कारवायांमुळे टिटवाळा-खडवली परिसरही रडारवर आला आहे. खडवली भागात मोठ्या प्रमाणावर परप्रांतीयांची संख्या वाढत असून यात बांगलादेशी नागरिकही आश्रयाला आहेत. त्यापैकीच हे संशयित दहशतवादी असावेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT